तुझ्या वाचुनी मी इथे राहताना
तुझ्या आठवांचा मनी जोगवा रे !
घरासारखे वाटणारे तरीही
नसे या घराला जुना गोडवा रे !
घरी लोक माझेच सारे तरीही
असे एकटेपण कसे मी सहावे ?
- नायिका
"किती झाला रे रिपोर्ट ?.... कधी संपेल ?" या ठराविक प्रश्नापलिकडे माझ्याकडे बोलायला काही नव्हतं. वाटायचं काय वैत्ताग येत असेल या सर्वाना, रोज उठून तोच प्रश्न विचारते. काय करणार माझ्याकड़े करायला काही नव्हते.
एकदा मी , D, A आणि AJ गुलमोहर कैंटीन ला बसलो होतो. मी म्हणलं " मी पुढल्या वर्षी बारीक़ होणार, तुम्ही कोणी नसणार मग बाहेर एकटी कुठे येणार जेवायला? मेस चं (न) जेवून सुकून जाणार !" .
माझं वाक्य अगदी मस्करीत घेतलं सर्वानी. ( मला पण तेच अपेक्षित होतं ). पण रूम वर येउन माझं नको तिथे चालणारं डोकं अखेर चालू लागलं. काय लाइफ असेल पुढच्या वर्षी ? मी कोणाला छळेन ? त्या मेल्स ? पिंग करून सांगणे ' lunch @badlu at 1.15 sharp' आणि सगळे हजर. सगळ संपणार ! विचार करून अक्षरश : शहारा आला अंगावर. असेच दिवस सरत गेले.
मग या लोकांची कामं वाढत गेली अणि माझा एकटेपणा पण.
हा एकटेपणा दुसर्या विषयात पण मान वर काढू लागला.
काल 'त्याला' म्हणाले - " का रे हल्ली तू गप्पा नाही मारत माझ्याशी :( , नुसता फ़ोन विडियो कॉल, तेच प्रश्न आणि तीच उत्तरं. काहीतरी बोलत जा की. सांगत जा ऑफिस मधे काय काय होतं. काय केलास जेवायला ? काय काम केलस ? काहीतरी वेगळ्या गप्पा मार ना रे जरा "
...........
"तू नीट रिप्लाय पण करत नाहीस मी काय सांगितले त्यावर , मी काय बोलते याकडे लक्ष्य पण नसते तुझे x-( ..... मी फ़ोन ठेवते "
.......
आज सकाळी मी त्याला सांगितलेलं माझं डोक दुखतय म्हणुन .... नंतर दुपारी रात्री फ़ोन झाला तेव्हा काहीच कसं नाही विचारलं त्याने ? :(
..........
"आपण लग्न कधी करुयात ? लवकर करू ... २०११ नको खुप लाम्ब आहे ते .... आत्ता .... उद्या करू ....... "
"खुप दिवस झाले तू लवकर ये .... मला खुप एकटं वाटतय . IIT मधे पण कोणी नाहीये , आणि घरी जावं तर घरी पण कोणी नसतं ... मी काय करू ?? मला वैत्ताग आलाय सगळ्याचा. ये आणि घेउन जा मला "
या सर्व वाक्यांचा एकच निष्कर्ष होता :
प्राजक्ता पाटिल याना आजुबाजुला लोक लागतात, एकट्या पडल्या की त्यांचे डोके फिरते !
'त्याने' समजावले - "
"अरे तो जय नाहीये ना सध्या , मग माझ्यावर आहे जबाबदारी. खुप कामं असतात मग. म्हणुन जरा गड़बड़ होते सकाळी ऑफिस मधून बोलताना बाकी काही नाही गं , वेडुच आहेस"
"आणि पुढल्या वर्षी तर तुझा MTP असेल , तुला पण काम असणार. ज्या lab मधे असशील तिकडे ओळखी होतील , ग्रुप जमेल तुमचा पण .. नाही एवढा वैत्ताग येणार ... don't worry xxx "
" अगं फार दिवस नाही राहिले आता. मागल्या वर्षी आपण १००० दिवस राहिले असे चालू केले होते. त्यातले ५०० संपले बघ. अग पटकन जातील राहिलेले दिवस. आता तुझं दुसरं वर्ष पण संपेल, कळणार पण नाही तुला. बघ ५०० दिवस बाकी, त्यातले माझ्या २ ट्रिप्स मिळून गेला १ महिना , लग्नात गेला १ महिना , बघ २ महीने असेच गेले :) "
" मी येतोच आहे आहे रे फेब मधे. २ च महीने राहिले. की मग दिवाळी .... :) मग मार्च मधे आपलं लग्न अणि मग जुलै मधे तू इकडे ..... ये ssssssssss"
महिन्यांचा हिशोब देऊन , माझा आत्ता मिनीटाचा पण न लागणारा हिशोब सोडवण्याचा प्रयत्न तो करत होता. (जगाच्या दुसर्या टोकात राहून या शिवाय आणखी काही करणे कुठे त्याच्या हातात होते ? )
मला कळत होते तो काय समजवण्याचा प्रयत्न करत होता.
पण मला काही सुचत नव्हते. सकाळच्या मोकळ्या वेळी तर रूम मधे एकटी असले की काही कळत नाही. येवढीशी ती रूम , ती पण खायला उठते.
मग वैत्ताग येउन पुण्याला जाते, आणि तिकडे अश्याच ४ खोल्या खायला उठतात.
... मला नेमका कशाचा त्रास होत होता तेच कळत नव्हते. 'त्याच्या' वाचून असणारा एकटेपणा काही नवीन नव्हता.
आत्ता बरोबर असलेली लोकं काही महिन्यात निघून जाणार ... म्हणुन ???
तो मला रोज समजावतो ... मला पण "तेवढ्यापुरते" समजते .....
जरी आपले रक्त गोठून गेले
जरी भोवती सुन्न अंधार आहे !
तुझा हात हातात आहे अजुनी
तुझी ज्योत जगण्यास आधार आहे !
सुखालाच नाकारताना कशाला
उगा आज डोळ्यातुनी पाझरावे !
. . . .
कितीदा हसुनी नव्याने जगावे
किती रंग या जीवनाचे पहावे ....... :)
Friday, April 2, 2010
चिडावे तरी कोणावर ?
जून महिन्याची संध्याकाळ. नायकाने नायिकेला फ़ोन केला. " @@@, कळत नाही काय करावं ? आत्ता जुलै मधे येऊ का दिवाळीत येऊ ? ". दोघेही हा विचार करून - करून थकले होते. काही सुचेना दोघाना.
नायिका म्हणाली, "अरे मॉम काय म्हणतेय ?"
नायक : "दिवाळी" , एक चिंताग्रस्त उत्तर !
नायकाच्या आईची इच्छा की त्याने दिवाळीत यावे. काय चूक आहे यात ? कोणत्याही आईला वाटणारच आपल्या मुलाने दिवाळीत घरी असावे , त्यात मागची दिवाळी चुकलेली , मग तीव्र इच्छा ! नायकाची आई तिच्या जागी एकदम बरोबर ...
नायक आणखिन confused ... डिसेम्बर नंतर जवळ - जवळ ५-६ महीने उलटलेले ... प्रेयसीला भेटल्याशिवय करमत नाहिये आणि आईला नाही पण म्हणवत नाहिये. नाही म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे ? नायकाला पण जुलै आणि दिवाळीत अशी दोन्ही वेळी यायची इच्छा ... आता "इच्छा तेथे मार्ग " ही म्हण जरी खरी असली तरी ती फ़क्त फ़ळ्य़ावर ! दोन्ही वेळेला येता येणं तर शक्यच नव्हतं. नायक कधी पण यायला तयार ! दिवाळीच्या कड़े त्याचा कल. त्याचाही काय चुकल?
मराठी माणसाला अमेरिकेत पणत्या न लावता दिवाळी साजरी करायला सांगणे .... त्यापेक्षा करुच नये ना ! नायक त्याच्या जागी एकदम बरोबर ...
नायिका आणखिन confused !! काही कळत नव्हत. दोन मुद्दे डोळ्यासमोर आले :
१. दिवाळी plan ला संमती दर्शविणे :
यात नायिका बरीच अस्वस्थ होती ... करण गेल्या १० वर्षात ठरला नाही तो फॅमिली ट्रिप च मुद्दा घरी निघालेला ...
" दोन वर्षात तू जाशील, मग आपली अशी ट्रिप होणारच नाही कधी ! जाऊ आपण केरळला ! " - नायिकेचे वडिल
घरातले सर्व खुश झाले , वा बऱ्याच दिवसानी ट्रिप ठरते आहे. नायिकेला कळत नव्हत. ती रात्रीच सांगणार होती नायकाला की दिवाळी मधेच ये !
आता काय करावे कळेना. आई - बाबांना नाही म्हणणे शक्य नाही , पण नायकावर जिवापाड प्रेम. त्याने दिवाळीत यावं अशी दडलेली इच्छा.
आणखी एक मुद्दा , ज्यामुळे निश्चित निर्णय घेता येइना. नायिकेच्या बहिणीची CA ची परीक्षा ! आता या परीक्षेत जर पूर्ण यश मिळाला तर ट्रिप च प्लान फत्ते
होणार. पण आत्ता याची खात्री काय ? नक्की ट्रिप होणार का नाही ?
बहिण, " जर माझे दोन्ही पेपर सुटले तरच जायचे " .
आता नायिकेचे आई, बाबा आणि बहिण आपल्या जागी बरोबर !
२. जुलै ला संमती दर्शविणे :
हे नायिकेला ला चालणार होतं. कारण सुट्टी होती त्यात बाकी कोणालाच काहीच आक्षेप नव्हता. दिवाळीत नाही म्हणलं तरी सुट्टीचा प्रॉब्लम आला असता.
१५ दिवस सलग सुट्टी ? जरा अवघडच होतं. लेकचर्स ची काही चिंता नव्हती ... पण sysad-गिरी ? कोणीही एडजस्ट करायला तयार होत नाही. त्यात जर कोणत्या प्रोजेक्ट नी डोक वर काढलं असतं तर पुन्हा अवघड परिस्थिति झाली असती .
हा प्रॉब्लम नायिका सांगणार तरी कोणाला ? नायकाला पण हा प्रॉब्लम विशेष पटत नव्हता. त्याचं म्हणणं तिसरया सेम ला काही काम नसतं. पण नायिकेच्या बाबतीत तशी परिस्थिति नव्हती. आत्ता जर दिवाळीत येण्याला संमती दाखवली असती
आणि नंतर ... केरळ चा प्लान ठरला असता किंवा सुट्टी नसती मिळाली तर पुन्हा नायकाची चिड - चिड होणार ... अर्थात नायिकेची पण !
सर्व बाजुंचा विचार करून , शेवटी नायिकेने ठरवले जुलै ला संमती द्यायची. Safest option is the BestEST option !
नायिका आपल्या जागी बरोबर ... ... "बहुतेक" ??
पुन्हा चर्चा सुरु. नायक अणि नायिका यांचे रोज फ़ोन वर यावरच वाद / चर्चा. शेवटी नायिकेने सांगितले "मला जुलै ऑप्शन बरा वाटतोय, तरी पण मॉम ला वाटत असेल दिवाळीत यावे, तर ये दिवाळीत. बघू काय होइल ते होइल. आपल्याला आत्ता एडजस्ट केलेच पाहिजे ... आणि करुयात ... नंतर आयुष्य आपलेच आहे ". नायकाला काही विशेष मान्य होत नव्हते मात्र नायिकेला मनातून कळत होते ... प्रेमी युगुल आपापल्या आई - वडिलांचे मन मोडायला तयार होत नाहीयेत.
एक दिवस नायकाचा नायिकेला फ़ोन , " एक चांगली बातमी आहे. उड्या मारायच्या नाहीत".... नायिका बातमी ऐकण्यास आतुर ... "बहुतेक जुलै ठरते आहे. मेनेजर म्हणाला ओक्ट. मधे काही काम(रिलीज़ ) असेल तर दिवाळीत फार सुट्टी नाही मिळणार. पाहिजे तर आत्ता १५ दिवस जा , आणि दिवाळीत ८ दिवस"
नायकाने खुशीने विमानाचे बुकिंग करून टाकले. नायिका खुश ... पण मनात एक विचार डोकावला "जुलै मधे यायला हा मुलगा इतका खुश झाला, याची इच्छा तरी काय होती ? जुलै का दिवाळी ?" ... थोडा वेळ उगाच विचार करून नायिकेने पण विचाराला उडवून लावले. आणि कामाला लागली. खुश होऊं उगाचच त्या दिवसाची तारीख, वेळ पुन्हा पुन्हा पाहू लागली, जणू काही प्रत्येक मिनिटाला दिवस सरणार होते. वेडीच ती त्याच्यासाठी ! जी-मेल च्या स्टेटस वर लगेच काउंटर सुरु झाला.
आयुष्यात उधाण आले. फ़ोन वर पुन्हा गोड चर्चा सुरु झाल्या, त्या १५ दिवसात .. हे करू ... ते करू ...
१३ जुलै , नायकाचे मुंबई विमानतळावर आगमन ... नायिका वाट बघत उभीच ! ७ एक महिन्यांनी मिलन ...
१५ दिवस मजेत गेले ...कळले पण नाही कसे सरले दिवस ... काही "विशेष" क्षणांची साथ घेउन नायक निघाला ... पुन्हा तीच ताटातूट ...
८ दिवस गेले ... दोघे आपापल्या कामात गुंतले ... विडियो चाट , फ़ोन पुन्हा चालु झाले ... वाट पाहू लागले पुढच्या "विशेष" क्षणांची ...
नायिकेच्या घरी ट्रिप ची आखणी सुरु झाली. एक नवा पर्याय पुढे आला , सिंगापूर !!! सर्व खुश :-) प्रश्न बाकी होता तो बहिणीच्या रिझल्टचा ..
ऑगस्ट ३१ ला नायिकेच्या बहिणीचा रिझल्ट लागला .... दुर्दैवाने एक ग्रुप सुटला दूसरा राहिला ... आणि नोव्हेम्बर मधे पुन्हा परीक्षा देणं आलं .
झालं ... ज्याची शंका होती अगदी तसाच झालं ... फॅमिली ट्रिप चा प्लान बारगळला.
नायिका अस्वस्थ झाली ... तिला वाटत होतं साडेसाती संपली .. आता सगळ चांगलं होइल ... पण पुन्हा तिच्या नशिबाने दगा दिला.
नायिकेचा सेफ गेम चुकला .
नायक आणि नायिका फ़ोन वर ...
नायक : " आई आज म्हणत होती, त्यांचा केरळ प्लान cancel झाला वाटतं ... आला असतास बाबा दिवाळीत"
नायिका : "अरे मला कळतय रे मॉम ला काय वाटतय ... पण मला आधी कसं कळणार की असं सगळ होइल. मला समजुन घे रे !!"
नायक : "हो गं, मी तुला दोष देत नाहिये ... आणि तूला दुखावत पण नाहीये. मला फ़क्त मन मोकळ करायचय. शेवटी येवढच आहे की मला पण येता आलं नाही आणि तुम्ही पण कुठे गेला नाहित."
नायिका २ दिवस विचार करते यावर. दिवस रात्र हाच विचार , झोप नाही , कामात लक्ष्य नाही ... फ़क्त येवढाच विचार ... चुकलं कुठे ? चुकलं कोणाचं ? चिडावे तरी कोणावर ?
नायक ... बरोबर ...
नायकाची आई ... बरोबर
नायिकेचे आई वडिल , बहिण .... बरोबर ...
आणि नायिका ?? .... बरोबर .... "बहुतेक" ... !!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Subscribe to:
Comments (Atom)