तुझ्या वाचुनी मी इथे राहताना
तुझ्या आठवांचा मनी जोगवा रे !
घरासारखे वाटणारे तरीही
नसे या घराला जुना गोडवा रे !
घरी लोक माझेच सारे तरीही
असे एकटेपण कसे मी सहावे ?
- नायिका
"किती झाला रे रिपोर्ट ?.... कधी संपेल ?" या ठराविक प्रश्नापलिकडे माझ्याकडे बोलायला काही नव्हतं. वाटायचं काय वैत्ताग येत असेल या सर्वाना, रोज उठून तोच प्रश्न विचारते. काय करणार माझ्याकड़े करायला काही नव्हते.
एकदा मी , D, A आणि AJ गुलमोहर कैंटीन ला बसलो होतो. मी म्हणलं " मी पुढल्या वर्षी बारीक़ होणार, तुम्ही कोणी नसणार मग बाहेर एकटी कुठे येणार जेवायला? मेस चं (न) जेवून सुकून जाणार !" .
माझं वाक्य अगदी मस्करीत घेतलं सर्वानी. ( मला पण तेच अपेक्षित होतं ). पण रूम वर येउन माझं नको तिथे चालणारं डोकं अखेर चालू लागलं. काय लाइफ असेल पुढच्या वर्षी ? मी कोणाला छळेन ? त्या मेल्स ? पिंग करून सांगणे ' lunch @badlu at 1.15 sharp' आणि सगळे हजर. सगळ संपणार ! विचार करून अक्षरश : शहारा आला अंगावर. असेच दिवस सरत गेले.
मग या लोकांची कामं वाढत गेली अणि माझा एकटेपणा पण.
हा एकटेपणा दुसर्या विषयात पण मान वर काढू लागला.
काल 'त्याला' म्हणाले - " का रे हल्ली तू गप्पा नाही मारत माझ्याशी :( , नुसता फ़ोन विडियो कॉल, तेच प्रश्न आणि तीच उत्तरं. काहीतरी बोलत जा की. सांगत जा ऑफिस मधे काय काय होतं. काय केलास जेवायला ? काय काम केलस ? काहीतरी वेगळ्या गप्पा मार ना रे जरा "
...........
"तू नीट रिप्लाय पण करत नाहीस मी काय सांगितले त्यावर , मी काय बोलते याकडे लक्ष्य पण नसते तुझे x-( ..... मी फ़ोन ठेवते "
.......
आज सकाळी मी त्याला सांगितलेलं माझं डोक दुखतय म्हणुन .... नंतर दुपारी रात्री फ़ोन झाला तेव्हा काहीच कसं नाही विचारलं त्याने ? :(
..........
"आपण लग्न कधी करुयात ? लवकर करू ... २०११ नको खुप लाम्ब आहे ते .... आत्ता .... उद्या करू ....... "
"खुप दिवस झाले तू लवकर ये .... मला खुप एकटं वाटतय . IIT मधे पण कोणी नाहीये , आणि घरी जावं तर घरी पण कोणी नसतं ... मी काय करू ?? मला वैत्ताग आलाय सगळ्याचा. ये आणि घेउन जा मला "
या सर्व वाक्यांचा एकच निष्कर्ष होता :
प्राजक्ता पाटिल याना आजुबाजुला लोक लागतात, एकट्या पडल्या की त्यांचे डोके फिरते !
'त्याने' समजावले - "
"अरे तो जय नाहीये ना सध्या , मग माझ्यावर आहे जबाबदारी. खुप कामं असतात मग. म्हणुन जरा गड़बड़ होते सकाळी ऑफिस मधून बोलताना बाकी काही नाही गं , वेडुच आहेस"
"आणि पुढल्या वर्षी तर तुझा MTP असेल , तुला पण काम असणार. ज्या lab मधे असशील तिकडे ओळखी होतील , ग्रुप जमेल तुमचा पण .. नाही एवढा वैत्ताग येणार ... don't worry xxx "
" अगं फार दिवस नाही राहिले आता. मागल्या वर्षी आपण १००० दिवस राहिले असे चालू केले होते. त्यातले ५०० संपले बघ. अग पटकन जातील राहिलेले दिवस. आता तुझं दुसरं वर्ष पण संपेल, कळणार पण नाही तुला. बघ ५०० दिवस बाकी, त्यातले माझ्या २ ट्रिप्स मिळून गेला १ महिना , लग्नात गेला १ महिना , बघ २ महीने असेच गेले :) "
" मी येतोच आहे आहे रे फेब मधे. २ च महीने राहिले. की मग दिवाळी .... :) मग मार्च मधे आपलं लग्न अणि मग जुलै मधे तू इकडे ..... ये ssssssssss"
महिन्यांचा हिशोब देऊन , माझा आत्ता मिनीटाचा पण न लागणारा हिशोब सोडवण्याचा प्रयत्न तो करत होता. (जगाच्या दुसर्या टोकात राहून या शिवाय आणखी काही करणे कुठे त्याच्या हातात होते ? )
मला कळत होते तो काय समजवण्याचा प्रयत्न करत होता.
पण मला काही सुचत नव्हते. सकाळच्या मोकळ्या वेळी तर रूम मधे एकटी असले की काही कळत नाही. येवढीशी ती रूम , ती पण खायला उठते.
मग वैत्ताग येउन पुण्याला जाते, आणि तिकडे अश्याच ४ खोल्या खायला उठतात.
... मला नेमका कशाचा त्रास होत होता तेच कळत नव्हते. 'त्याच्या' वाचून असणारा एकटेपणा काही नवीन नव्हता.
आत्ता बरोबर असलेली लोकं काही महिन्यात निघून जाणार ... म्हणुन ???
तो मला रोज समजावतो ... मला पण "तेवढ्यापुरते" समजते .....
जरी आपले रक्त गोठून गेले
जरी भोवती सुन्न अंधार आहे !
तुझा हात हातात आहे अजुनी
तुझी ज्योत जगण्यास आधार आहे !
सुखालाच नाकारताना कशाला
उगा आज डोळ्यातुनी पाझरावे !
. . . .
कितीदा हसुनी नव्याने जगावे
किती रंग या जीवनाचे पहावे ....... :)
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment